Saturday, November 04, 2006

शब्द माझे संपले ( गझल )


::::::: शब्द माझे संपले ( गझल ) :::::::::

होंठ माझे जोडले, अन शब्द माझे संपले...
तुज समोर पाहता, शब्द माझे संपले...

ताल ह्रिदयी, लय श्वासाची, सर्व काही हरपले...
रात्र माझी जागली, अन शब्द माझे संपले........

सांजवारया सोबती जे, गंध तुझे; मज स्पर्शिले....
आसवे सोबतीस आले, अन शब्द माझे संपले....

ह्रुदयतली तळमळ कशी तुला मी दाखवू.....
मन बोलु लागले, अन शब्द माझे संपले.......

अंतरीचे गूढ सर्व, आतच-आत दडवले....
सांगू कसे तुला मी, शब्द माझे संपले...

व्यक्त केले सर्व भाव, किती कवितेत लिहिले....
आता तरी समज तू, कारण शब्द माझे संपले.....

----------------हर्षल पाटील ( मेघराज )...............